महाराष्ट्रात योगींची जादू, १८ जणांचा प्रचार, १७ विजयी; पोस्टर लागले...'स्ट्राइक रेट ९५%'File Photo
Published on
:
25 Nov 2024, 7:21 am
Updated on
:
25 Nov 2024, 7:21 am
मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडल्या आहेत. ज्यांचे निकालही शनिवारी घोषित झाले. यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यातच आता राज्यात सरकार बनवण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या विजयामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महत्वाची भूमीका राहिली आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर जनतेने महायुतीच्या पारड्यात बहुमत घातल्याचे दिसून आले. याचे श्रेय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही दिले जात आहे. महाराष्ट्रात योगींचे पोस्टर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत. या पोस्टरवर त्यांचा स्ट्राईक रेट ९५ टक्के असे लिहिण्यात आले आहे.
भाजपने उतरवले ४० स्टार प्रचारक
महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचंड विजयानंतर महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रचारही चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत प्रचारासाठी तब्बल ४० स्टार प्रचारक उतरवले होते. या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष प्रकाश नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मोठ्या चेहऱ्यांना भाजपने स्टार प्रचारक म्हणून समोर आणले होते. या ४० नावांमध्ये सर्वाधिक चर्चेत नाव आहे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे.
मुख्यमंत्री योगींची चालली जादू
तज्ञांच्या विश्लेषणानुसार, योगी आदित्यनाथ यांनी १८ भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला होता, ज्यामध्ये १७ उमेदवारांचा विजय झाला आहे. यातील फक्त एकच भाजपचे अकोला पश्चिम विधानसभा जागेवरून निवडणूक लढवणारे विजय अग्रवाल यांचा पराभव झाला आहे. अग्रवाल यांचा काँग्रेसच्या साजिद खान यांनी फक्त एक हजार मतांनी पराभव केला. अशा प्रकारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ९५ टक्के स्ट्राईक रेट मिळाला आहे.