बसच्या धडकेत महिला ठार:पुणे - सातारा रस्त्यावरील घटना, नातही गंभीर जखमी; बस चालकावर गुन्हा
2 hours ago
1
विवाह समारंभावरुन घरी निघालेल्या पादचारी महिलेचा भरधाव पीएमपी बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील नातूबाग परिसरात घडली. अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता,पुणे) असे मयत झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालक सतीश राजाराम गोरे (वय २७, रा. कोंढणपूर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय साळुंके (वय ३८) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके कुटुंबीय नातेवाईकांच्या विवाहासाठी पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास साळुंके, त्यांची आई आशाबाई, मुलगी प्रचिती घरी निघाले. सातारा रस्त्यावरील नातूबाग परिसरात ते रस्ता ओलांडत होते. रिक्षाने ते घरी निघाले होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने रस्ता ओलांडणाऱ्या आशाबाई साळुंके आणि त्यांची नात प्रचिती यांना धडक दिली. अपघातात आशाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक फिरोज शेख पुढील तपास करत आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)