स्मशानभूमीतील लाकडावरुन हत्या:पत्नीवर वाईट नजर ठेवल्याने भाच्याने केला 74 वर्षीय मामाचा खून, मृतदेह जाळला

1 hour ago 1
पत्नीवर वाईट नजर ठेवणाऱ्या एका 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची 2 तरुणांनी हत्या करून त्याचा मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याचा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांनी उजेडात आणला आहे. पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरात तावशी स्मशानभूमी येथे लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत अ्सल्याचे व बाजूला माेठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडल्याचा प्रकार वाचलदंननगर पाेलिसांना समजला हाेता. त्यानुसार, वालचंदननगर पाेलिस व स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी स्मशानभूमीत पडलेल्या लाकडावरुन संबंधित लाकडे काेणत्या वखारीतून आणली याचा शाेध घेऊन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, हरिभाऊ धुराजी जगताप (वय-74.रा.गंगाखेड, परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय-30) व त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (23, दाेघे रा.गाेखळी, ता.फलटण, सातारा) असे आराेपींचे नाव आहे. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी स्मशानभूमीतील लाेखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेले हाडे तसेच पूर्व बाजूस 40 फुट अंतरावर रक्त सांडलेले दिसत हाेते. तसेच लाेखंडी जाळीच्या बाजूस जळालेली लाकडे व इतर लाकडे दिसत हाेती, परंतु त्यावेळी त्याठिकाणी नेमके काय जळाले हे समजत नव्हते. त्यामुळे घटनास्थळाची पाेलिसांनी बारकाईने पाहणी केली असता हा घातपाताचा प्रकार दिसून आला. त्यामुळे बारामती विभागाचे अपर पाेलिस अधिकारी गणेश बिरादर व डीवायएसपी डाॅ. सुर्दशन राठाेड यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांचे पथक इंदापूर, माळशिरस, फलटण तालुक्यात जाऊन त्यांनी तांत्रिक व गाेपनीय खबऱ्या मार्फत तपास केला. परंतु काेणती माहिती उपलब्ध हाेत नव्हती. स्मशानभूमीत मिळून आलेले जळालेले व शिल्लक लाकडे ताब्यात घेऊन ती काेणत्या वखारीतील असल्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर सदर लाकडे ही गुणवरे, ता. फलटण येथील वखारीतून दादासाहेब हरिहर व विशाल खिलारे यांनी खरेदी करुन मयताच्या अंत्यविधीसाठी वाहनात घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सदर दाेन्ही आराेपींना ताब्यात घेऊन त्यांची चाैकशी केली असता आराेपी दादासाहेब हरिहर याचा मामा त्याच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत असल्याने आराेपींनी कट रचून मयतास गंगाखेड येथून सताेबाची यात्रा, टाकेवाडी, ता. माण, सातारा येथे जेवण करण्याच्या निमित्ताने साेबत घेऊन जाऊन 15 नाेव्हेंबर राेजी मध्यरात्री गाडी तावशी येथील स्मशानभूमी जवळ लघवीला थांबवली. त्यानंतर आराेपींनी मयताच्या डाेक्यात लाकडी दांडक्याने मारुन त्यास जिवे ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी स्मशानभूमीत मृतदेह जाळला. एसीबीचे पाेलिस निरीक्षक अविशन शिळीमकर व वालचंदननगरचे पाेलिस निरीक्षक राजकुमार डाेणगे यांचे पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article