माझ्या लढाईला अंत नाही, हरल्याची मला खंत नाही:पुन्हा उठेन अन् पुन्हा लढेन, महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी; मुंबईत उद्धव ठाकरे यांचे पोस्टर

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीची प्रचंड हाराकिरी झाली. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावे लागले. याऊलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला तब्बल 57 जागा मिळाल्या. यामुळे ठाकरे गटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना मुंबईत उद्धव ठाकरे यांचे एक पोस्टर लागले आहे. या पोस्टरद्वारे ठाकरे गटाने यापुढेही आपण परिस्थितीशी दोनहात करणार असल्याचा संदेश दिला आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा फोटो असणारे एक पोस्टर लावण्यात आले आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांचा पराभव केला आहे. झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची नुकतीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे झिशान यांना या मतदारसंघात सहानुभूती मिळेल असा दावा केला जात होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत मतदार वरुण सरदेसाई यांच्या बाजूने उभे राहिले. वरुण यांचा 11,365 मतांनी विजय झाला. वरुण यांना 57708, तर झिशान यांना 46343 मते पडली. आता पाहू काय आहे पोस्टरवर? ठाकरे गटाचे नेते सदा परब यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. त्यावर एक कविता लिहिण्यात आली आहे. त्याद्वारे पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर भाष्य करण्यात आले आहे. लढता लढता हरलो तरी, हरल्याची मला खंत नाही... लढा माझा महाराष्ट्रासाठी, लढाईला माझ्या अंत नाही... पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, महाराष्ट्रधर्म टिकवण्यासाठी !!! जय महाराष्ट्र हे पोस्टर ज्या भागात लागले आहे, त्या भागात उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थानही आहे. ठाकरे गटात विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा सुरू झाली आहे. पण पक्षाने या पोस्टरद्वारे आपल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयी मतदारांत प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती. ती लोकसभा निवडणुकीत दिसून आली. त्यानंतर ही सहानुभूती विधानसभा निवडणुकीतही मिळेल असे मानले जात होते. पण ठाकरे गटाला अवघ्या 20 जागावर समाधान मानावे लागले. यामुळे उद्धव ठाकरे यांची घोर निराशा झाली. एक नजर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यात भाजपच्या पारड्यात सर्वाधिक 132 जागा गेल्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41जागा मिळाल्या. दुसरीकडे, काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीची या निवडणुकीत मोठी हाराकिरी झाली. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावे लागले. सपच्या खिशात 2, तर इतर पक्ष व अपक्षांच्या 10 जागा निवडून आल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article