Published on
:
25 Nov 2024, 11:42 am
Updated on
:
25 Nov 2024, 11:42 am
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. या कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात कर भरणा करण्यासाठी आलेल्या एका 67 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
श्रीकांत पुरूषोत्तम शेठ (67) असे मृत वृद्धाचे नाव असून ते पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या अयोध्या नगरीतील राम सोसायटीत राहत होते. केडीएमसीचे डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात विभागीय कार्यालय आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर रखडलेली कामे करण्याकरिता नागरिकांची येथे गर्दी झाली होती.
श्रीकांत शेठ हे पाणी बिल भरण्यासाठी आले होते. रांगेत उभे असताना श्रीकांत शेठ यांना अचानक चक्कर आल्याने ते बाकड्यावर बसले. मात्र काही वेळात ते बेशुद्धावस्थत गेले. सुरक्षा रक्षकांनी अँब्युलन्स मागवली. त्यांना शास्त्रीनगर हॉस्पिटलला हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.