ज्येष्ठ शाहीर मधुकर नेराळे यांचे निधन File Photo
Published on
:
25 Nov 2024, 9:46 am
Updated on
:
25 Nov 2024, 9:46 am
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सक्रिय शाहीर मधुकर नेराळे यांचे लालबाग येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आज रात्री त्यांच्या पार्थिवावर दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शाहीर नेराळे यांनी शाहीर शिवाजी साबळे यांच्या समवेत राज्यातील शाहिरांची अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेची स्थापना केली. या माध्यमातून शाहिरांचे अनेक प्रश्न सोडवले. राज्यातील तमाशा कलावंतांचे संघटनही त्यांनी केले. अनेक ज्येष्ठ शाहीर व तमाशा कलावंतांना त्यांनी मदत मिळवून दिली. राज्य शासनाच्या कलावंत मानधन समितीवर तसेच सेंसर बोर्डावरही त्यांनी पदे भूषविली. वडिलांनी तमाशा कलावंतांसाठी सुरू केलेल्या लालबागच्या हनुमान थेटरचा कारभार त्यांनी सांभाळला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या तमाशा कलावंतांसाठी निराळे यांचे हे थेटर आणि कार्यालय कलावंतांचे आजही आश्रयस्थान आहे.