Published on
:
25 Nov 2024, 11:17 am
Updated on
:
25 Nov 2024, 11:17 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकन वकिलांनी उद्योगपती गौतम अदाणी यांच्यासह सात जणांवर भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. लाचखोरी प्रकरणातील वादात तेलंगणा सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. तेलंगणा विद्यापीठासाठी अदानी समूहाने १०० कोटी रूपये दिले होते. विद्यापीठाला देण्यात आलेला हा १०० कोटी रुपयांचा निधी सरकारने परत केला असल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
तेलंगणात विद्यापीठासाठी तरूणांमध्ये उद्योग कौशल्य क्षमता विकसित होण्यासाठी कौशल्य विकास उपक्रमांतर्गत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाकडून १०० कोटी रूपये निधी देण्यात आला होता. ही रक्कम तेलंगणा सरकारने समूहाला परत केली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, "अनेक कंपन्यांनी यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीला निधी दिला आहे. त्याच प्रकारे अदानी समूहानेही १०० कोटी रुपये दिले होते;पण सरकारने अदानी समुहाला पत्र लिहिले आहे की, त्यांनी कौशल्य विद्यापीठासाठी दिलेले 100 कोटी रुपये ते स्वीकारणार नाहीत."
Hyderabad | Telangana Chief Minister Revanth Reddy says, "...Many companies have given funds to the Young India Skill University. In the same way, the Adani group also gave Rs 100 crores. Yesterday, we wrote a letter to Adani on behalf of govt stating that the state govt is not… pic.twitter.com/x8LESKCrWV
— ANI (@ANI) November 25, 2024