आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी पात्रता फेरीचे सामने सुरु आहेत. दक्षिण अफ्रिका झोनमध्ये आयव्हरी कोस्ट आणि नायजेरिया यांच्यात सामना रंगला. य सामन्यात नाणेफेकीचा कौल नाजेरियाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे नाजेरियाने वादळी खेळी केली. सुलेमन रनसेवे आणि सेलिम सलाऊ जोडीने 128 धावांची भागीदारी केली. यात सेलिम सलाऊने 53 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. तर सुलेमन रनसेवेने 29 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. त्यानंतर इसाक ओकेपेने वादळी खेळी केली. त्याने 23 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 65 धावा केल्या. नाजेरियाने 20 षटकात 4 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना आयव्हरी कोस्ट हा संघ पुरता धुळीस मिळाला. अवघ्या 7 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. एकूण सहा खेळाडूंना आपलं खातंही खोलता आलं नाही. तर औतारा मोहम्मद सर्वाधिक 4 धावा केल्या. तसेच मिमी ॲलेक्स, मैगा इब्राहिम आणि डीजे क्लॉड याने प्रत्येकी एक धाव केली. 7.3 षटकातच आयव्हरी कोस्टचा खेळ संपला. नायजेरियाने 264 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
यापूर्वी सर्वात कमी धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम मंगोलियाच्या नावावर होता. मंगोलियाचा संघ 10 धावांवर तंबूत परतला होता. मात्र आता हा नकोसा विक्रम आयव्हरी कोस्टच्या नावावर रचला गेला आहे. दुसरीकडे, नायजेरियाने 264 धावांनी मिळवलेला विजयही ऐतिहासिक ठरला आहे. टी20 आंतरराष्ट्रिय क्रिकेटमधील हा तिसरा मोठा विजय आहे. यापूर्वी झिम्बाब्वेने 290, नेपाळने 273 आणि नायजेरियाने 264 धावांनी विजय मिळवला आहे. मुख्य आणि पूर्ण संघात सर्वात मोठा विजय श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने केनियाला 172 धावांनी पराभूत केलं होतं.
Dominant Performance by Nigeria!
🇳🇬 Nigeria: 271/4 (20.0 overs) 🇨🇮 Côte d’Ivoire: 7 each retired (7.3 overs)
Nigeria delivers a record-breaking performance, securing an emphatic triumph with bat and ball.#T20AfricaMensWCQualifierC#T20MensAfricaWCQualifierC… pic.twitter.com/VqLK0quSji
— Nigeria Cricket Federation (@cricket_nigeria) November 24, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
आयव्हरी कोस्ट (प्लेइंग इलेव्हन): औतारा मोहम्मद, कौकाउ विल्फ्रेड, मिमी ॲलेक्स, कोने अझीझ, डोसो इसियाका (कर्णधार), मैगा इब्राहिम (विकोटकीपर), कोने नगनामा, डीजे क्लॉड, ओउतारा जकारिद्जा, लाडजी इझेचील, पंबा दिमित्री.
नायजेरिया (प्लेइंग इलेव्हन): सुलेमन रनसेवे, सेलिम सलाऊ (विकेटकीपर), इसाक डॅनलाडी (कर्णधार), ओलायंका एलिजा ओलाले, सिल्वेस्टर ओकपे, रिदवान अब्दुलकरीम, इसाक ओकेपे, व्हिन्सेंट अडेवोये, मोहम्मद तैवो, प्रॉस्पर उसेनी, पीटर अहो