Published on
:
25 Nov 2024, 9:22 am
Updated on
:
25 Nov 2024, 9:22 am
जळगाव | घरचे मंडळी अंत्यविधीला गेलेली असताना स्वतःच्या सात वर्षीय मुलीला फाशी देत स्वतःही फाशी घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना रविवारी हरिविठ्ठल नगरातील व्यंकटेश नगरात घडली. शहरातील हरिविठ्ठल नगरात दीपक दाभाडे याचे एकत्रीत कुटुंब आहे. त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून त्यावर संपूर्ण घराचा उदनिर्वाह होतो. शनिवारी रात्री भुसावळ येथील त्यांचे नातेवाईकांचे निधन झाल्यामुळे रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दीपक हे आपल्या दोघा भावंडांसह वहिनींना घेवून भुसावळ येथे अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी झाल्यावर घरी पोहचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दीपक दाभाडे यांनी बेल वाजूनही आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही म्हणून त्यांनी दरवाजाची आतून लावलेली कडी धक्का मारुन उघडली.
घराचा दरवाजा उघडताच दीपक दाभाडे यांना त्यांच्या पत्नी सोनाली दीपक दाभाडे (वय ३६) व मुलगी तेजस्वीनी दीपक दाभाडे (वय ७) या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांनी दोन वेगवेगळ्या दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या .
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, प्रवीण जगदाळे यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. विवाहिता सोनाली दाभाडे यांचे माहेर मालेगाव येथील आहे. त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.