लोकांना लुटण्यासाठीच भाजपला एक देश एक निवडणूक हवी आहे असा घणाघात आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. महाराष्ट्रात सीएनजीचे दर दोन रुपयांनी वाढले यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीचे निकाल लागले आणि सीएनजीची किंमत दोन रुपयांनी वाढली. यावर आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की यासाठीच भाजपला एक देश एक निवडणूक हवी आहे. कारण एकदा निवडणूक झाली की लोकांना त्यांना लुटता येईल. आज देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत कारण देशात सतत निवडणुका होत असतात असेही भारद्वाज म्हणाले.
VIDEO | “BJP wants to conduct elections in all the states at once so that they can start looting the people after winning the elections. The prices of petrol and diesel are normal in India only because of these frequent elections,” says AAP leader Saurabh Bharadwaj… pic.twitter.com/ygdjDdNWqJ
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2024