जुन्या वादातून कोयत्याने ‎छातीवर वार:तरुण ठार‎, नाशिकच्या विडी कामगारनगरात रात्री हल्ला‎

2 hours ago 1
जुन्या वादातून तरुणावर 4 संशयितांनी कोयत्याने वार‎करून खून केल्याचा प्रकार विडी कामगारनगर येथे‎ रविवारी (दि. 24) रात्री 10.30 वाजता घडला. या‎‎घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले‎‎असून पोलिसांकडून त्यांचा शोध‎‎सुरू आहे. हल्लेखोर स्थानिक‎‎असल्याचा पोलिसांचा कयास आहे.‎ ‎विडी कामगारनगरातील मनपा‎‎शाळेच्या मागे विशांत भोये (29)‎‎हा मित्रांसोबत गप्पा मारत असताना‎‎चार संशयित अचानक या ठिकाणी‎आले. यातील एकाने विशांतच्या छातीवर कोयत्याने‎वार केला. यत गंभीर जखमी झालेल्या विशांतला‎खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत‎घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा ‎दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.‎ नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पंचवटीमध्ये हा खून झाला. तेथे मृत विशांत हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. तेवढ्यात तेथे 10-12 जणांचे टोळके आले. त्यांनी अचानक विशांत आणि त्याच्या मित्रांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. यातील एका तरूणाने तर विशांतर थेट कोयत्याने हल्ला केला आणि ते पळून गेले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला विशाल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला त्याच्या मित्रांनी उपचारांकरिता तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र घाव वर्मी लागल्याने रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशांत अन् हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच वादातून या टोळक्याने हा हल्ला करत त्याची खून केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article