Manoj Jarange Patil connected Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. तसंच मराठा आरक्षण आणि उपोषणावर जरांगेंनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...
मनोज जरांगे पाटील, देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. उद्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असं वाटतं? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारलं विचारण्यात आला. तेव्हा आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे? आमच्या वाट्याला कधीही संकटच आलेले आहेत. 70-75 वर्षात आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे, असं जरांगे म्हणालेत.
आमची जात आणि आमचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे, असं जरांगे म्हणाले.