हिवाळा ऋतू सुरु झाला असून आता हिवाळयात हंगामी फळभाज्या बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. आता प्रत्येक घरांमध्ये हंगामी फळभाज्यांचे आहारात समावेश केला जातोय. त्यातच आता शिंगाडे हे फळ बाजारात यायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसात तमच्या आहारात शिंगाडयांचे समावेश करावे. शिंगाडा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना उपवासाच्या वेळी ते खाणे आवडते. तर काही लोकं ते उकडून खातात, म्हणजेच अनेक प्रकारे खाण्यात त्याचा समावेश होतो.
गुरुग्रामच्या नारायणा हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, शिंगाडे हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, प्रथिने, थायमिन आणि अनेक पोषक घटक असतात. अशा वेळी उकडलेले शिंगाडे खाणे खूप फायदेशीर ठरते.
पचनक्रिया चांगली होते
पाण्यात शिंगाडे उकडून खाल्याने त्यांचे पचन करणे देखील सोपे आहे. यामुळे तुमची पचनक्रिया तर सुधारतेच, शिवाय बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. ते खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. शिंगाड्याचे पीठ आतड्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
त्वचा आणि केसांसाठी
केसांच्या समस्येसाठीही उकडलेले शिंगाड्याचे सेवन फायदेशीर मानले जाते, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात असलेले लॉरिक ॲसिड केस मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय उकडलेले शिंगाडे खाल्ल्यानेही त्वचा निरोगी राहते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवा
ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्यांनी आहारात शिंगाड्याचे समावेश करावा. यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात. यात अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
शरीर हायड्रेटेड ठेवा
विशेषत: हिवाळ्यात काही लोकं पुरेसे पाणी पित नाहीत, ज्यामुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. उकडलेले शिंगाडे खाल्ल्याने शरीरात हायड्रेशन राहते. जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पित असाल तर उकडलेले शिंगाडे नक्की खा. हे खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.