लक्ष्मण हाकेंची मलाईदार खात्यांची मागणी:महसूल, शिक्षण खात्याचा धरला आग्रह; मराठा समाजाचे 205 नव्हे 112 आमदार जिंकल्याचा दावा
2 hours ago
1
मराठा नेते मनोज जरांगे यांनी त्यांचे 205 उमेदवार कोठे निवडून आले सांगावे खोटे गोष्टी सांगून दिशाभूल करू नये. मराठा समाजाचे 112 आमदार निवडून आले आहे. ओबीसी नेते यांना सर्व जाती यांनी सहकार्य केले. राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्या सांगण्यानुसार जरांगे यांचे आंदोलन सुरू होते, असे ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले की, आमच्या आंदोलनावर अनेक आरोप झाले पण आम्ही ठाम भूमिका घेतली. आघाडी नेते यांनी ओबीसी आंदोलनकडे दुर्लक्ष केले. ज्यांना आम्हाला निवडणुकीत पाड्याचे आहे त्यांना पाडले आहे. जातीय जनगणना झाली पाहिजे. राज्यात सत्ता बदलण्याची आम्ही भाषा केली आणि ते करून दाखवले. माझी विधान परिषदवर बोळवण करू नये तर मी राज्यातील अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असल्याने नवीन सरकारने मला कॅबिनेट मंत्रिपद देऊन महसूल किंवा शिक्षण खाते द्यावे असे मत असे मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मनोज जरांगे एक बावळट माणूस लक्ष्मण हाके म्हणाले की, राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडली असून त्यात ओबीसी समाजाने चांगले मतदान केले आहे. आम्ही ओबीसी उमेदवार दिले त्याठिकाणी आणि महायुतीला मतदान करावे आवाहन केले होते त्यास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. जो राज्याचा मुख्यमंत्री होईल त्यांनी पंचायत राज निवडणूक कधी होणार याबाबत पुढाकार घ्यावा. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहे ते मार्गी लागावे. मराठा नेते मनोज जरांगे एक बावळट माणूस उठतो आणि रोज वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका बदलतो आणि राज्यात जातीय तेढ निर्माण करतो. जरांगे राज्यात 130 मतदार संघात पाडापाडी करण्याचे सांगत होते. पण त्यांनी ज्याठिकाणी त्यांनी मेसेज दिला त्याजागी विरोधी उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे आता त्यांचे आरोपांना उत्तर देण्यास कंटाळा मला आला आहे. व्हिजन आमचे यशस्वी झाले असून जरांगे या खुळचट माणसाला माझे सांगणे मी ज्याठिकाणी सभा घेतल्या तिथे उमेदवारी विजयी झाले. जनतेने जरांगेंचे थोबाड फोडले लक्ष्मण हाके म्हणाले की, लबाड जरांगे यांनी सल्लागार याच्याकडून माहिती घ्यावी. राज्यातील उमेदवारांनी जरांगे याचा फोटो लावून कुठे मते मागितली नाही, जनतेने त्याचे थोबाड फोडले आहे. ज्यांना पराभूत करण्यास ते गेले तेच विजयी झाले. छगन भुजबळ यांचा पराभव करण्यास गेलेले जरांगे तोंडघशी पडले. घनसांगवीमध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांच्या पराभवाचा आम्हाला आनंद. मी जिंतूर, अहमदपूर, माजलगाव, गेवराई, भुम, तुळजापूर, परतूर आदी मतदारसंघात सभा घेऊन उमेदवार यांना चांगले मताधिक्य दिले आहे.आघाडी सरकार जिंकले असते तर ओबीसी प्रश्न मार्गी लागले नसते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)