ठाणे विधानसभा मतदार संघात विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यकर्त्यांसह आश्रमात भेट घेतलीPudhari News network
Published on
:
25 Nov 2024, 5:43 am
Updated on
:
25 Nov 2024, 5:43 am
ठाणे : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच व्हावे अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी केली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी रविवारी (दि.24) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी आलेल्या सर्व आमदारांनी राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनीच करावे, अशा भावना व्यक्त केल्या.
ठाणे जिल्हा
कोपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोकणात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 20 हजारांच्या मताधिक्याने विजय.
विधानसभेच्या एकूण जागा : 18
महायुती : 16 जागा
महाविकास आघाडी : 2
महायुतीच्या विजयाची वैशिष्ट्ये
2019 मध्ये महायुतीला 16 जागा मिळाल्या होत्या, यंदाही 16 जागा मिळाल्या.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा हिंदुत्ववादाला साथ
उद्धव ठाकरेंच्या सभांचा फॅक्टर निष्प्रभ ठरला.
शिवसेना ठाकरे गट, काँगे्रसचा धुव्वा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागा मिळवत राज्यात दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रविवारी शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली असून यामध्ये राजेश क्षीरसागर, चंदगड विधानसभा अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि कोल्हापूर आमदार चंद्रदीप नरके, दीपक केसरकर, संजय मंडलिक, धैर्यशील माने, वक्फ बोर्डचे चेअरमन आणि राज्य मंत्री समीर काजी, संजय शिरसाठ, जोगेंद्र कवाडे, आमदार शांताराम मोरे या आमदारांचा समावेश आहे.
यावेळी शिंदेंच्या भेटीला आलेल्या आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्याकडे संख्याबळ आहे आणि फार कमी मताने आमचे तीन-चार आमदार गेलेत, नाहीतर आम्ही 65ते 66 पर्यंत पोहोचलो असतो. महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांच्या कामांनी भुरळ घातलेली आहे, त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या लोकांची भावना आणि अपेक्षा आहे की, पुन्हा संधी मिळाली पाहिजे, अशी भावना आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली. शिंदे समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री पद आम्हालाच पाहिजे, असा आग्रह कायम ठेवला आहे.
ठाणे विधानसभा मतदार संघात विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.Pudhari News network
महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा नेता
मुख्यमंत्र्यांनी जे बळ दिले त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सर्व 10 आमदार आलो आहोत, अशी भावना धैर्यशील माने यांनी व्यक्त केली. एक शिवसैनिक म्हणून तसेच महाराष्ट्रातील आम जनतेची इच्छा हीच आहे की, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच असावे, रात्रन्दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे, निश्चितपणे खात्री आहे की आदरणीय मोदी आणि अमित शहा एकत्र मिळून मुख्यमंत्रीपदी सकारात्मक निर्णय घेतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढली, त्यामुळे इतका मोठा मँडेड मिळाला असल्याचे आमदारांनी सांगितले.
महालक्ष्मीने दिले महायुतीला आशीर्वाद
महायुतीचे रणशिंग हे कोल्हापुरातून फुंकले गेले होते, आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली होती, आता महायुतीला न भूतो न भविष्यती असं यश महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या विकासावर आम जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी दहाही आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत, कोल्हापूर जिल्ह्याने शंभर टक्के स्ट्राईक रेट महायुतीला दिला आहे.
महायुतीच्या यशात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मोठा हातभार आहे. त्यामुळे मित्र पक्ष म्हणून आम्हाला एकही जागा मिळाली नाही, महायुतीची सत्ता येत आहे, आता त्यांनी सत्तेमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशाचे महामानकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन वाघ आहेत. यांच्या नेतृत्वा खाली राज्यांत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे.
आ. प्रताप सरनाईक, विजयी उमेदवार
मला पराभूत करण्यासाठी स्वकीयांनी देखील विरोधकांची भूमिका बजावली. मात्र जनता जनार्दन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे व तमाम शिवसैनिक, मित्रपक्षांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून आणले. त्यामुळे हा सत्याचाविजय आहे.
डॉ. बालाजी किणीकर, आमदार महायुतीचे विजयी उमेदवार
भिवंडी शहरात दहा वर्षे आमदार म्हणून मी केलेल्या विकासकामांना पसंत केले म्हणून मला मतदारांनी पुन्हा संधी दिली. याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. निवडणुकीत सर्वधर्मीय जनतेने मला पाठिंबा दिला होता. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ भिवंडी शहरातील लाखो लोकांपर्यंत पोहचवण्यात आम्ही यशस्वी झालो.
महेश चौगुुले, नवनिर्वाचित आमदार