उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लोकार्पणाच्या प्रतीक्षेत

2 hours ago 2

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लोकार्पणाच्या प्रतीक्षेतfile photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

22 Sep 2024, 9:14 am

Updated on

22 Sep 2024, 9:14 am

सापाड : कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची बहु मजली नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून हे कार्यालय लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयाचे लोकार्पण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा चांगलाच फायदा होणार असून सुसज्य आणि अद्ययावत कार्यालयाच्या लोकार्पणानंतर कामे देखील स्मार्ट पद्धतीने होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

कल्याणातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात आहे. मात्र या कार्यालयाची जागा ही अतिशय अपुरी पडत असून अडगळीच्या ठिकाणी हे कार्यालय उभे आहे. त्यामुळे या कार्यालयात नवीन गाड्यांच्या पासिंगसह नवीन लायसन्स आणि नूतनीकरणाचे कामे केली जात होती. मात्र अडगळीच्या जागी असणारे सध्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन गाड्यांच्या पासिंगसाठी मोठी कसरत करावी लागत होती. परिणामी परिसरात मोठी वाहतूककोंडी निर्माण होत असून कार्यालयीन कामे करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लायसन्स शिवाय कोणतीही कामे होत नव्हती. दुचाकी, रिक्षा, हलक्या चारचाकी वाहने आणि अवजड वाहने पासिंगसाठी सध्या रिंग रूट मार्गातील वाडेघर परिसर आणि उंबार्डे परिसर या ठिकाणी वाहनांची पासिंग केली जात आहे. तर अवजड वाहनांसाठी नांदिवली येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्या आरक्षित भूखंडावर पासिंगची सुविधा करण्यात आली आहे. या संपूर्ण किचकट व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत होती. मात्र आरटीओ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कल्याण मधील वाडेघर येथील नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने १० कोटी ४६ लाख २५ हजार ९४२ रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्यामुळे येणाऱ्या काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सुसज्य कार्यालय उपलब्ध होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article