उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला:यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच रचला, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला
2 hours ago
1
उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेनंतर स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला होता. त्यावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. स्टेज खचला, संकेत कळला? असा सवाल शेलार यांनी केला आहे. यांचा भाषणांचा प्रभाव पहा किती, भाषण संपताच खचते पायाखालची माती, असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची काल ठाण्यात जाहीर सभा पार पडली. त्यांनी या सभेत भाजप, शिंदे गट आणि मनसेवर जोरदार हल्ला चढवला. ठाणे हे गद्दारीचे केंद्रबिंदू असून या केंद्रबिंदूच्या बुडाला आग लावली, तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी स्टेजवर शिवसैनिकांची गर्दी झाली. त्याचवेळी स्टेजचा काही भाग अचानक खाली गेला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. काय म्हणाले आशिष शेलार?
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती" असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड, अडीच वर्षात लुटले खूप मोठे घबाड. उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला, यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच रचला, असे म्हणत आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, तर गुजरात नवनिर्माण सेना
दरम्यान, शिवसेनेचे ठाणे व ठाण्याची शिवसेना हे नाते तुम्ही ठाणेकरांनीच जोडले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे म्हणून सर्वत्र ओळखले जाते. पण मिंध्यांनी ठाण्याला गद्दारीचा कलंक लावला. मिंध्यांच्या बुडाला मशाल लावली तर महाराष्ट्र गद्दारमुक्त होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तर देवेंद्र फडणवीसांनी आधी स्वत:चे जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा, असा टोला फडणवीसांना लगावला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता गुजरात नवनिर्माण सेना झाली, अशी टीका राज ठाकरेंवर केली. हे ही वाचा... विलासराव देशमुखांना जय भीम म्हटल्याने माझी मंत्रीपदाची संधी हुकली:नितीन राऊतांचा व्हिडिओ चित्रा वाघांनी केला पोस्ट काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या एका व्हिडिओची सध्या चर्चा रंगली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्री केलं नाही, असं नितीन राऊत बोलताना दिसत आहे. सविस्तर वाचा... आधी स्वत:चे जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा:देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. हे जर व्होट जिहाद करत असतील तर, आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आधी स्वत:चे जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)