उमरा येथे‌ भजनांचा गजर:फुलांचा वर्षाव करत आदिशक्तीची विसर्जन मिरवणूक

2 days ago 3
‘उदे गं अंबे उदे’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फुलांच्या वर्षावाने सोमवारी उमरा नगरीत दुर्गामूर्तींची मिरवणुक काढण्यात आली. दुपारी चार वाजता सुरू झालेला विसर्जन मिरवणूक सोहळा तब्बल सहा तास रंगला गावातील एकूण ६ मंडळाच्या दुर्गामूर्तींना भाविकांकडून भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. गावातील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गामूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेपासून सलग नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी भागवत एकादशीला दुर्गामूर्तींना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. दुपारी चार वाजता मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला. देवीच्या वहन मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून फटाक्यांची आतीषबाजीसुद्धा करण्यात आली सायंकाळी सर्वच मंडळांकडून लवाजम्यासह विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या वहनोत्सवात महिला भजन मंडळी. टाळ मृदंग बँड पथक तसेच ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुका निघाल्या. ठिक ठिकाणी गावकऱ्यांकडून चहा, फराळ, पाण्याची व्यवस्था केलेली होती. मिरवणुकीची सांगता कृषी कामगार चौक येथे सर्व मंडळांनी सामूहिक महाआरतीने केली. महाआरती दरम्यान आकाशातून पुष्पवृष्टी करण्यात आली. अकोट ग्रामीण पोलिसांनी ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article