एक राजवाडा सोडून...; स्वाती मालीवाल यांचा अरविंद केजरीवालांना टोला

1 hour ago 1

आपचे खासदार स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

04 Oct 2024, 9:23 am

Updated on

04 Oct 2024, 9:23 am

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे केले. ते आपच्या एका खासदाराच्या निवासस्थानी स्थलांतरित झाले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या (आप) बंडखोर राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. (Swati Maliwal On Arvind Kejriwal)

स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले आहे की, 'एक होते मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम, ज्यांनी राजवाडा सोडला आणि 14 वर्षे जंगलात घालवली. स्त्रियांच्या सन्मानासाठी रावणसारख्या शक्तिशाली राक्षसाशी लढा दिला. आजकाल प्रभू श्रीरामाशी स्वतःची तुलना करणारे लोक एक महाल सोडून दुसऱ्या महालात राहायला जातात, याला मोठा त्याग म्हणतात. भ्रमाच्या मागे आदर्शांचा विसर पडतो. महिलांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ते वाचवतात आणि यातच ते धन्यता मानतात. हे राम!' (Swati Maliwal On Arvind Kejriwal)

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी केला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी केजरीवाल यांची तुलना प्रभू राम यांच्याशी केली होती. तर श्रीराम वनवासात गेल्यानंतर भरत यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवले होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आतिशी दिल्ली चालवतील.

एक थे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम, जिन्होंने महल छोड़ वन में 14 साल गुज़ारे। नारी सम्मान के लिए रावण जैसे शक्तिशाली राक्षस से युद्ध किया।

आज कल जो लोग अपनी तुलना प्रभु श्री राम से करवाते हैं, महा त्याग बताकर एक महल छोड़ दूसरे महल में रहने जाते हैं। माया के पीछे आदर्श भूल…

— Swati Maliwal (@SwatiJaiHind) October 4, 2024

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article