पात्र शिक्षकांना पदोन्नतीची दसरा भेट:24 उच्चश्रेणी मुख्याध्यापक, 7 विस्तार अधिकारी पदोन्नती, शिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कार

2 hours ago 2
हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, अराजपत्रित मुख्याध्यापकपदावर पदोन्नती देण्यात आली असून त्यांना गुरुवारी ता. ३ समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून पात्र शिक्षकांना दसरा भेट असल्याचे मानले जात आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागाकडून अराजपत्रित मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया रखडली होती. या संदर्भात विविध शिक्षक संघटनांनी वेळोवेळी निवेदन दिली तसेच आंदोलन देखील केले आहे. या शिवाय पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्याचे पत्र लोकप्रतिनिधींनी शिक्षणाधिकाऱ्याकडे दिले होते. जिल्हयातील शाळांमधून मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्यामुळे गुुणवत्तेवर परिणाम होत होता तर विस्तार अधिकारी नसल्यामुळे शाळांचे मुल्यांकन करणे, अडचणींच्या वेळी भेटी देऊन चौकशी करण्याचे कामही ठप्प होऊ लागले होते. त्यामुळे या पदोन्नत्या तातडीने कराव्यात अशी मागणी केली जाऊ लागली होती. त्यानंतर शिक्षक संघटनांनी ता. ९ ऑक्टोबरपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी करण्यात आली होती. जिल्हयातील शिक्षक संघटनांची मागणी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यानी गुरुवारी ता. ३ पदोन्नतीची प्रक्रिया राबवली. यावेळी पात्र शिक्षकांना ३ अराजपत्रित मुख्याध्यापक, ७ जणांना विस्तार अधिकारी, २४ जणांना पदोन्नती देऊन त्यांनाी समुपदेशनाने पदस्थापनाही देण्यात आली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत हि प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने दिलेली पदोन्नती शिक्षकांसाठी दसरा भेट असल्याचे मानले जात आहे. या पदोन्नतीबद्दल शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके यांचा शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कुलपीद मास्ट, सुभाष जिरवणकर माधवराव वायचाळ यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article