Parbhani: १७ हजार साहित्यांचे ज्येष्ठ नागरीकांना वाटप

2 hours ago 2

परभणी (Parbhani):- ज्येष्ठ नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वंदनिय बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) ज्येष्ठ नागरीक मंचाच्या वतीने आ. डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणीत १७ हजार कृत्रिम साहित्य, साधनांचे मोफत वाटप करण्यात आले.

परभणी विधानसभे चे आ.डॉ.राहुल पाटील यांचा उपक्रम चार हजार ज्येष्ठ नागरीकांची उपस्थिती

शहरातील पाथरी रोडवरील आर. पी. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी देशातील, महाराष्ट्रातील सर्वात मोठे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अलीमकोचे के.डी.गोटे, संजय मंडल, विजय कान्हेकर, डॉ.विवेक नावंदर, ज्येष्ठ नागरीक मंचाचे डोंगरे, विधानसभा प्रमुख दिनेश बोबडे, शिवसेना तालुका प्रमुख नंदूपाटील अवचार, सदाशिव देशमुख, अर्जून सामाले, ज्ञानेश्वर पवार, नवनीत पाचकोर, अनिल डहाळे, रवि पतंगे, प्रशास ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी ४ हजार जेष्ठ नागरीकांसाठी १७ हजार साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, चालण्याची काठी, कुबड्या, कमोड व्हील चेअर, कृत्रिम दात, पाटीचे पट्टे, गुडघ्याचा पट्टासह इतर साधनांचा समावेश आहे. यावेळी ज्येष्ठ नागरीक(Senior citizens) मंचाच्या माध्यमातून आगामी काळातही ज्येष्ठ नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article