हिंगोली बाजार समितीचे कंत्राटदार संचालक अपात्र:जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय

1 hour ago 1
हिंगोली बाजार समितीचे कंत्राटदार संचालक अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल. बाेराडे यांनी शुक्रवारी ता. ४ दिला आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. हिंगोली बाजार समितीच्या सन २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माधव कोरडे हे संचालक म्हणून विजयी झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या संचालक पदाला आव्हान देणारा अर्ज परसराम राऊत यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे दाखल केला होता. संचालक कोरडे यांचे मुळ उत्पन्न शेतीपासून नसून ते कंत्राटदार म्हणून काम करतात. विविध शासकिय कार्यालयाकडून त्यांनी कंत्राट घेऊन ते कामे करीत असून त्यापासून त्यांना शेती पेक्षा जास्त उत्पन्न मिळते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न शेतीपेक्षा कंत्राटदारीमधून अधिक असल्यामुळे त्यांचे संचालक पद रद्द करावे अशी मागणी याद्वारे केली होती. या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल. बोराडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर संचालक कोरडे यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय त्यांनी दिला आहे. या निर्णयाविरुध्द अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदतही निर्णयाद्वारे देण्यात आली आहे. या निर्णयामुळे बाजार समितीमध्ये विरोधीगटाला मोठा धक्का बसला आहे. हिंगोली बाजार समितीमध्ये काही दिवसापुर्वीच मुख्याध्यापक असलेले बाजार समितीचे उपसभापती अशोक श्रीरामे, संचालक शामराव जगताप यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय डॉ. बाेराडे यांनी दिला होता. त्यानंतर आता हा तिसरा निर्णय आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आता या निर्णया्विरुध्द वरिष्ठ कार्यालयाकडे अपील दाखल केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article