गिरगाव पाटीजवळ भरधाव बसची दुचाकीला धडक:पती ठार, पत्नी गंभीर जखमी, उपचारासाठी नांदेडला हलविले

2 hours ago 1
नांदेड ते वसमत मार्गावर गिरगाव पाटीजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या महामंडळाच्या बसने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. ४ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील कुंडलीक रामराव उन्हाळे (६५) व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कुंडलीक उन्हाळे (६०) हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी मालेगाव (जि. नांदेड) येथे गेले होते. त्या ठिकाणी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून दोघेही गावाकडे परत निघाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुचाकी वाहन गिरगाव पाटी जवळ आले असतांना नांदेडकडून परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या महा्मंडळाच्या बसने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कुंडलीक यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मीबाई या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, जमादार मधुकर आडे, विजयकुमार उपरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मीबाई यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article