गोंदिया : मालकाने ड्रायव्हरची हत्या करुन मृतदेह पुरला खड्डयात

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

04 Oct 2024, 12:56 pm

Updated on

04 Oct 2024, 12:56 pm

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : कामगाराने उधार घेतलेले 80 हजार रुपये परत केले नाहीत, तसेच तो कामावर उपस्थित राहत नाही म्हणून मालकाने पत्नी आणि मुलग्याच्या सह्हायाने कामगाराचा खून करुन मृतदेह खड्डयात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (दि.29) घडली. यानंतर या घटनेचा पोलिसांनी फिल्मीस्टाईल तपास करत बुधवारी (दि.2) उलगडा केला. शांतनू अरविंद पशिने (वय ३६, रा. मोहगाव, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे.

मागील काही दिवसांमध्ये ६ ते ७ जणांनी एका युवकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरला आहे, अशी चर्चा सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या एका खबऱ्याने ऐकताच त्याने ही माहिती गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम थेर यांच्यामार्फत ठाणेदार किशोर पर्वते यांना दिली. यावर ठाणेदार पर्वते यांनी पोलिस ताफ्यासह गुप्तरित्या पूर्ण परिसर पिंजून काढला. तथापि, २ ऑक्टोबर रोजी ठाणेदार पर्वते यांनी सहकारी पोलिसांसह मध्यरात्री गौतमनगर येथील स्मशानभूमीलगतचा झुडपी जंगल पिंजून काढला. या ठिकाणी एक मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत असल्याचे समजले. त्यानंतर सदर मृतदेह खड्ड्याबाहेर काढला. मृताचा फोटो परीसरातील लोकांना दाखविला असता त्यातील काही जणांनी सदर मृतदेह शांतनू पशिने याचा असल्याचे आणि तो विक्रम बैस (रा. गौतमनगर) याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून असल्याचे ओळखले. यावरून पोलिसांनी विक्रम बैस याच्याबाबत चौकशी केली असता तो आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार असल्याचे आढळून आले. तसेच विक्रम बैससोबत राहणारे अन्य तीन ते चारजणसुद्धा फरार असल्याचे चौकशीत दिसून आले. या प्रकरणी ठाणेदार किशोर पर्वते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव गेडाम करीत आहेत.

शांतनू पशिने हा विक्रम बैस याच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामाला होता. त्याने विक्रम बैसकडून ८० हजार रुपये उधारी घेतले होते. कामावरसुद्धा येत नव्हता. त्यामुळे विक्रम बैस याने पत्नी, मुलगा व त्याच्या साथीदारांच्या मदतीने शांतनूला गौतमनगर स्मशानभूमीस्थित झुडपी जंगल परिसरात नेऊन लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली व जीवे ठार मारले. इतकेच नव्हे, तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झुडपी जंगलात पाच फुट खोल खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरला.

गोंदिया शहर पोलिसांनी खासगी टिव्ही चॅनलवरील क्राईम पेट्रोल मालिके प्रमाणे या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला असून विक्रम उर्फ विक्की पवन सिंग बैस (वय ३६), किरण विक्रम बैस (वय ३२), चित्ता विक्रम बैस (वय १९, सर्व रा. गौतमनगर, गोंदिया) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. तर, अन्य ३ ते ४ आरोपींचाही यात समावेश आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article