बदलापूर; शाळेच्या ट्रस्टींचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा:तुषार आपटे, उदय कोतवाल यांना जामीन मंजूर, एसआयटीने घेतले होते ताब्यात

2 hours ago 2
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील शाळेचे संचालक तुषार आपटे व उदय कोतवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोघांना गुरुवारीच जामीन मंजूर झाला होता. पण एसआयटीने त्यांना अन्य एका प्रकरणात ताब्यात घेतले होते. आता त्यांना या दुसऱ्याही प्रकरणातही दिलासा मिळाला आहे. बदलापूर येथील एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर केले आहे. त्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी या प्रकरणातील अन्य आरोपी शाळेचे संचालक तुषार आपटे व उदय कोतवाल यांना अटक केली होती. या दोघांना काल गुरुवारी कोर्टात हजर केले होते. तिथे कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. पण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने त्यांना अन्य एका प्रकरणात अटक केली. या प्रकरणातही जामीन मिळवण्यासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दोघांनाही जामीन मंजूर केला. त्यामुळे तुषार आपटे व उदय कोतवाल या दोघांचाही तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हायकोर्टाने पोलिसांना सुनावले होते खडेबोल उल्लेखनीय बाब म्हणजे तुषार आपटे व उदय कोतवाल या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांचा जामीन फेटाळून लावला होता. तसेच पोलिसांच्या निष्क्रियतेवरही तीव्र ताशेरे ओढले होते. बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन किती दिवस झाले? त्या शाळेच्या संचालकांना अद्यापही अटक का झाली नाही? तुम्ही आरोपींना जामीन मिळण्याची वाट पाहात आहात का? असे विविध सवाल हायकोर्टाने या प्रकरणी पोलिसांना खडेबोल सुनावताना केले होते. हायकोर्टाच्या या कठोर भूमिकेनंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तुषार आपटे व उदय कोतवाल या दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, एसआयटीने या प्रकरणी दोन वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले आहेत. हे ही वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article