नरहरी झिरवळांना आंदोलन करणे शोभत नाही:शरद पवारांनी 4 वेळा मुख्यमंत्री भूषवले, पण आरक्षणावर काहीच केले नाही - संजय शिरसाट

2 hours ago 1
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलेले आंदोलन हे सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. हे आंदोलन करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांचे हे आंदोलन त्यांच्या पदाला न शोभणारे नाही, अशा तिखट शब्दांत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी आदिवासी आमदारांनी मंत्रालयात केलेल्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली आहे. नरहरी झिरवळ तसेच इतर आमदारांनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारचे विरोधात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच विरोधकांनी देखील या प्रकरणात टीका केली आहे. संजय शिरसाट यांनी या आंदोलनावर भाष्य करताना त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, विधानसभा उपाध्यक्ष यासारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे आंदोलन करणे उचित नाही. त्यांनी आंदोलन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची गरज होती. हे आंदोलन ते आरुढ असणाऱ्या पदाला शोभत नाही. 4 वेळा मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी काय केले संजय शिरसाट यांनी यावेळी शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. ते म्हणाले, शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा 75 टक्के पर्यंत करण्याचे सूतोवाच केले आहे. केंद्र सरकारने यासंबंधी एखादा निर्णय घेतला तर त्याला आपण पाठिंबा देऊ असे ते म्हणालेत. पण शरद पवार स्वतः महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत. मात्र चारही वेळा त्यांनी याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. चार वेळा मुख्यमंत्री असताना त्यांना आरक्षणाची कुठलीही आठवण झाली नाही. त्या काळात केंद्रात सत्ता असतानाही त्यांनी याविषयी अशी कुठलीही चर्चा केली नाही. त्यामुळे केवळ निवडणुका आल्यानंतर अशा चर्चा केल्या जात असल्याची टीका शिरसाट यांनी यावेळी केली

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article