एकता रॅलीत समतेचा जागर‎:मंगळवेढ्यात 48 मंडळाच्या मिरवणुका, लाखभर देवीभक्त सहभागी

4 days ago 3
मंगळवेढा शहर व तालुक्यातील ७२ पैकी ४८ मंडळानी विजयादशमीनिमित्त मिरवणूक काढून शक्तिदेवीचा जागर केला. शहरात १७ तर ग्रामीण भागात ३१ नवरात्र मंडळे मिरवणूकीत सहभागी झाले होते. सायंकाळी सीमोल्लंघनानिमित्त आपट्याची पाने (सोने )एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. विजयादशमीच्या निमित्त सायंकाळी मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत लेझीम पथक, डीजे, ढोल ताशा, न्यू नॅशनल बँड, नवरंग बँड, दरबार बँड, किल्ले मच्छिंद्रगड बँड यांचा समावेश होता. देवीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाचा भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत ,विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी स्वागत केले. एकवीरा देवीच्या माळावर सायंकाळी ५ वा.तहसिलदार मदन जाधव यांचे हस्ते व पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत आपटयाच्या झाडाची पुजा करून सिमोल्लंघन झाले. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरु होत्या. विजयादशमी मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने व्यावसायिकांनी ,शेतकऱ्यांनी नवीन कामाचा शुभारंभ केला. सोने खरेदी तसेच दुचाकी व चारचाकी गाड्यांची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. विजयादशमीनिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढ्याचा नावलौकिक कायम रहावा, मंगळवेढ्यातील नागरिकांनी व तरुणांनी जातीभेद,अंधश्रद्धा,व ्यसनापासून दूर रहावे, ,शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सर्व जाती-धर्माचे बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. एकता रॅलीत समतेचा जागर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article