Sanjay Shirsat connected Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. शिवसैनिक देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा अशी आग्रही मागणी करत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने याबाबतचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...
एकनाथ शिंदे, नेते शिवसेनाImage Credit source: Facebook
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आलं आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असेल? याबाबतचा खल सुरु आहे. अशातच एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या १५ वर्षात इतकं काम झाला नाही जे मागच्या अडीच वर्षात झालं आहे. कोणताही प्लॅन नाही प्लॅन ए नाही प्लॅन बी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. राज्यात एकनाथ शिंदे हेच चांगलं नेतृत्व करतील, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले आहेत.