एका दुचाकीवर ८ लोकं...सोबत चटई, गादी, बादली अन् दांडके, ट्रॅफिक पोलिस म्हणाला..File Photo
Published on
:
16 Nov 2024, 6:19 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:19 am
पुढारी ऑनलाईन :
उत्तर प्रदेशच्या शाहजहापूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्धा डझनहून अधिक लोक एकाच दुचाकीवर बसल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांनी जेंव्हा या दुचाकीला थांबवले आणि गाडीवर बसलेल्या लोकांना मोजायला सुरूवात केली, तेंव्हा ट्रॅफिक पोलिसही अवाक झाले. कारण या एका दुचाकीवर एकुण आठ लोक बसले होते. त्यात एक काठी, चटई, गादी आणि बादलीचाही समावेश होता. हे पाहून ट्रॅफिक पोलिसाने कपाळावर हात मारला अन्.....
वास्तविक, शाहजहांपूरमध्ये सध्या वाहतूक महिना सुरू आहे. ज्याअंतर्गत वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यां विरोधात कारवाई केली जात आहे. या दरम्यान नियमित तपासणी दरम्यान ट्रफिक पोलिसांना एक दुचाकीचालक असा दिसला ज्याला पाहून पोलिसही अवाक झाले.
थांबवलेल्या या दुचाकीवर एक, दोन, तीन लोक नव्हे तर कुटुंबातील आठ सदस्य प्रवास करत होते. यामध्ये छोट्या मुलासह एक महिलाही होती. हे पाहून वाहतूक पोलिसही हैराण झाला. मात्र वाहतूक पोलिस दुचाकीचालकावर कारवाई करण्यापेक्षा त्याला जागरूक करताना दिसून आला.
या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला असून, यामध्ये एकाच कुटुंबातील ८ सदस्य यामध्ये पती, पत्नी मुलांसह आठ जणांचा समावेश होता. दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेटही परिधान केलेले नाही. यावर वाहतूक पोलिसांनी या व्यक्तीला अशा प्रकारे प्रवास करणे संपूर्ण कुटुंबासाठी धोकादायक असल्याचे सांगितले. तसेच पुन्हा अशा प्रकारे प्रवास न करण्याची ताकीद दिली.
ज्यावेळी वाहतूक पोलिसाने या दुचाकीचालकाला थांबवले तेंव्हा लोकांची गर्दी झाली. त्यातील एका व्यक्तीने दुचाकीचालकाला म्हणाला की, जर इतक्या लोकांना घेउन फिरायचे आहे तर मग ही दुचाकी विकुन सरळ एक रिक्षा तरी खरेदी कर... हा व्हिडिओ शाहजहांपूर जिल्ह्यातील मिर्झापूर हद्दीतील आहे. पोलिसाने संबंधित व्यक्तिला पुन्हा अशा प्रकारे प्रवास न करण्याची सूचना करून सोडून दिले.