एमपीसीबीमुळे उद्योग रखडले; 700 कोटींची गुंतवणूक ठप्प:सीएमआयएची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार

3 hours ago 1
नवउद्योजकांना उद्योगासाठी परवानग्या मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परवानग्या मिळत नसल्याने २० पेक्षा अधिक उद्योग गेल्या ६ महिन्यांपासून सुमारे ७०० कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे सीएमआयए आणि मसिआने मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, पर्यावरणमंत्री आणि मंत्री सावेंंना पत्र लिहून तक्रार केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कन्सेंट टू एस्टॅब्लिशमेंट आणि कन्सेंट टू ऑपरेट या दोन्ही परवानग्या मिळत नसल्याने संभाजीनगरचा विकास थांबला, असा तक्रारीचा पत्रात उल्लेख आहे. इज ऑफ डुइंग बिझनेसची एकीकडे चर्चा सुरू असताना शहरात उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एमपीसीबीकडून कन्सेंट टू एस्टॅब्लिश आणि कन्सेंट टू ऑपरेटचे परवाने मिळत नाहीत. मसिआने लिहिलेल्या या पत्रात प्रस्तावित परवाने मिळण्यास लागणाऱ्या विलंबामुळे एमपीसीबीसह शहराबद्दल नवीन येणाऱ्या उद्योगांचा गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परवाने प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी पत्रात केली आहे. परवानग्या बोर्ड स्तरावरूनच मंजूर हा प्रश्न बोर्ड पातळीवरचा आहे. माझ्या स्तरावरचा विषय नाही. त्यामुळे या परवानग्याबाबत मी भाष्य करू शकत नाही,’ -अच्युत नंदावटे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ. मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणार उद्योजकांनी यासंदर्भात माझ्याकडे हा विषय मांडला आहे. उद्योजकांना प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून परवानग्या मिळत नसल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीतहा विषय मांडणार. -अतुल सावे,ओबीसी कल्याण मंत्री. ६ महिन्यांपासून रखडल्या परवानग्या शहरात येऊ घातलेल्या कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी निगडित आवश्यक ते परवाने त्वरित मिळत नाहीत. त्यामुळे सीएमआयएने ९ जानेवारीला मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांच्याकडे पत्र पाठवत उद्योजकांनी यंत्रणेकडून हरॅशमंेट होत असल्याची तक्रार केली आहे. परवानग्या मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. औद्योगिक विकासासाठी परवानगी आवश्यक एमपीसीबीच्या परवानग्यांसाठी अडचणी येत आहेत. २० पेक्षा अधिक उद्योगांची सुमारे ७०० कोटींची गुंतवणूक होऊ शकते. परवानग्या मिळत नसल्याने विकास रखडला आहे. -चेतन राऊत, अध्यक्ष, मसिआ. कन्सेंट टू एस्टॅब्लिशमेंट महत्त्वाचे का? एमआयडीसीत नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर सुरुवातीला कन्सेंट टू एस्टॅब्लिशमेंट नावाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर उद्योग उभा राहिल्यानंतर उत्पादनासाठी कन्सेंट टू ऑपरेट ही परवानगी घ्यावी लागते. या परवानगीशिवाय उद्योग सुरू करता येत नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article