रेल्वेखाली चिरडून १३ ठार झाले
Published on
:
23 Jan 2025, 6:59 am
Updated on
:
23 Jan 2025, 6:59 am
जळगाव | जळगाव रेल्वे दुर्घटनेतील घटनास्थळी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना यांनी रात्री भेट दिली. जखमींचीही भेट घेत घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतली.
दि. 22 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास परधाडे येथे पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याच्या अफेतून प्रवाशांनी गाडी थांबून खाली उतरले व सुरक्षित जागी जात असताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली येऊन 13 जणांच्या मृत्यू झाला. तर जवळपास 19 जखमी झालेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर धरमवीर मीना हे तातडीने विदर्भ एक्सप्रेस ने घटनास्थळी येण्यास रवाना झाले होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास पाचोरा पासिंग या ठिकाणी उतरून त्यांनी पाचोरा येथील रुग्णालयात भरती असलेल्या जखमींची भेट घेतली. त्यानंतर रात्री घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर बाय रोड जळगाव येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी जखमी असलेल्या रुग्णांबरोबर त्यांनी भेट दिली. गोदावरी रुग्णालयात असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी ही ते गेले त्यानंतर थेट भुसावळ येथे येऊन सकाळी 5.30 च्या राजधानी एक्सप्रेस ने मुंबईकडे रवाना झाले.