रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल, 'मिशन अयोध्या' उद्यापासून चित्रपटगृहातInstagram
Published on
:
23 Jan 2025, 12:58 pm
Updated on
:
23 Jan 2025, 12:58 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून 'मिशन अयोध्या' प्रदर्शित होत आहे. हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित ‘मिशन अयोध्या’ चित्रपट आहे.
चित्रपटाबद्दल काय म्हणतात लेखक-दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे?
"प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील जन्मभूमीमुळे या मंदिराला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या राष्ट्रमंदिराने देशभरातील प्रत्येक रामभक्ताला एका धाग्यात जोडले आहे. आपण रामायण ऐकले, पाहिले; मात्र रामराज्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रभू श्रीराम हे कोणत्याही जाती-धर्मापुरते सीमित नाहीत; ते प्रत्येक भारतीयांचे आहेत. म्हणूनच, 'मिशन अयोध्या' हा केवळ एक चित्रपट नाही, तर राष्ट्रमंदिराच्या संरक्षणाची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव जागवणारी प्रेरणादायी कलाकृती आहे," असे लेखक-दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी सांगितले.