Published on
:
23 Jan 2025, 4:50 pm
Updated on
:
23 Jan 2025, 4:50 pm
अकोला : दुचाकीस्वार नियमांकडे दुर्लक्ष करीत विना हेल्मेट दुचाकी चालवत असताना जिल्हाभर २१ जानेवारी रोजी ६०० दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
या मोहिमेत, दुचाकीस्वारांकडून एकूण ६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अकोला शहरात वाहतूक शाखेने १७० दुचाकीस्वारांना अडवून, त्यांच्याकडून १ लाख ७० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. हेल्मेट न वापरणे हे केवळ नियमभंग नसून, ते जीवाशी खेळण्यासारखे आहे.
दुचाकी अपघातात डोक्याला गंभीर इजा टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे. दुचाकीस्वार नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांनी जिल्हाभर कारवाई केली आहे .