2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘धूम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या गेम चेंजिंग अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. चोरी, सुपरबाईक्स, चोरांना पकडण्यासाठीच्या युक्त्या यांमुळे हा चित्रपट तुफान चर्चेत होता. याच यशामुळे त्याचा सीक्वेलही प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यामध्ये ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन ही नवी जोडी प्रेक्षकांना पहायला मिळाली. पहिल्या भागाप्रमाणेच हा सीक्वेलसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता. यातील ऐश्वर्या आणि हृतिकचा लिपलॉक सीन तुफान चर्चेत आला होता. यावरून ऐश्वर्याला काहींनी कायदेशीर नोटिशीसुद्धा बजावल्या होत्या. एका मुलाखतीत ऐश्वर्या या किसिंग सीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. तिने हृतिकसोबतच्या या सीनला होकार का दिला, यामागचं कारण सांगितलं होतं.
ऐश्वर्या म्हणाली, “माझ्या करिअरमधील दहा वर्षांनंतर धूम हा चित्रपट आला. तोपर्यंत लोकांसाठी किसिंग सीन परिचयाचं झालं होतं. बदलच्या काळानुसार तुम्ही जबाबदारीने याचा विचार करता की प्रेक्षकांसाठी काय धक्कादायक असू शकतं किंवा काय नसू शकतं? बदलत्या काळानुसार एक सामाजिक आणि व्हिज्युअल कम्फर्ट (सहजतेपणा) येत असतो. तुम्ही तुमचा कम्फर्ट ओळखून निर्णय घेता. मी जेव्हा धूम या चित्रपटात किसिंग सीन केला तेव्हा आम्ही त्याला एका सीनदरम्यान शूट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या किसमध्येही डायलॉग होता. त्यात फक्त म्युझिक वाजतंय आणि आम्ही किस करतोय, असं काही नव्हतं. हृतिक आणि मी एकमेकांच्या मिठीत धावून जात नाही.”
हे सुद्धा वाचा
2012 मध्ये ‘डेली मेल’ला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या ‘धूम 2’बद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. त्यातील एका किसिंग सीनमुळे तिला अनेक नोटिशींचा सामना करावा लागला होता. “मी धूम या चित्रपटात किसिंग सीन केला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्यासाठी मला अनेक कायदेशीर नोटिशी मिळाल्या होत्या. देशातील काही लोक मला बोलू लागले की, तू आदर्श आहेस, तू आमच्या मुलींसाठी एक आदर्श उदाहरण आहेस, तू तुझं आयुष्य इतक्या आदरपूर्ण पद्धतीने जगतेस, त्यामुळे तुला स्क्रीनवर असे सीन्स करताना पाहणं त्यांच्यासाठी कम्फर्टेबल नाही. तू असं का केलंस, असा सवाल मला लोक करू लागले होते”, असं ऐश्वर्या म्हणाली होती.