"ओबीसी'तून मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम मराठा सेवा संघाने केली:मराठा भूषण, मित्र पुरस्कारांचे वितरण, उत्तमराव माने यांनी केला दावा‎

8 hours ago 1
करमाळा ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम मराठा सेवा संघाने केली होती व आजही त्याच भूमिकेवर ठाम आहे. यासाठी मराठा सेवा संघाने राखलेला करमाळ्यातील जातीय सलोखा उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने यांनी केले. मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा भूषण व मराठा मित्र पुरस्कार वितरण तसेच गुणवंतांचा गौरव सोहळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे झाला. यावेळी माने बोलत होते. यावेळी दशरथ कांबळे यांना मराठा सेवा संघ मार्गदर्शक पुरस्कार, कै. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठान (करमाळा) व नागनाथ लेझीम संघ (शेटफळ) यांच्यासह रिटेवाडी तसेच मांजरगाव ग्रामस्थांना विशेष सामाजिक गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यासोबतच माया काळे यांना उत्कृष्ट सेविका पुरस्कार तर शोभाताई गुट्टे, नलिनी जाधव, स्वाती फंड, राणी वारे, जानवी सावंत यांना मराठा रणरागिनी पुरस्कार आणि छत्रपती शासन ग्रुप आणि हिंदुस्तान मराठा फोर्ट्स दुर्गभ्रमंती व दुर्गजागर यांना विशेष गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच डॉ. आंबेडकर वादी चळवळ व सामाजिक संघटनेला मराठा मित्र व गुणगौरव पुरस्कार या कार्यक्रमात देण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमास सर्वच समाजातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा मित्र म्हणून भीमदलचे सुनिल भोसले यांना सन्मानित करण्यात आले मराठा भुषण पुरस्कार मनोज राऊत, विजय लावंड, नानासाहेब मोरे, संदीप पवार, संजय सावंत, संजय घोलप, अर्जुन फंड, मनोज राखुंडे, ॲड. कमलाकर वीर, ईश्वर भांडवलकर, संतोष गायकवाड, भरत लोकरे, धीरज लोकरे, ॲड. सविता शिंदे, प्रा. दिलीप जगताप, विजय तळेकर, विनय ननवरे, अतुल फंड, भरत आवताडे मराठा मित्र पुरस्कार श्रेणिक खाटेर, अल्ताफ तांबोळी, तानाजी जाधव, शिवाजी बंडगर, यशपाल कांबळे, सुनील भोसले, जमीर सय्यद, नारायण पवार, विश्वजीत परदेशी, युवराज जगताप, राजा कदम, दादा कोकरे, राजू आव्हाड, नागनाथ केकान, गणेश करे पाटील, कृष्णा येळवणे, अहमद कुरेशी, अजिंक्य पवार, मौला मुलाणी, अफसर जाधव यांना मराठा मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article