कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सात गोवंशांची पोलिसांनी केली सुटका:कारवाईत ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

2 hours ago 2
रात्र गस्तीवर असलेल्या ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून मूर्तिजापूर- दर्यापूर मार्गावरील दुर्गवाडा फाटा येथे पहाटे ४ च्या सुमारास कत्तलीकरिता अवैधरीत्या विनापरवाना घेऊन जात असलेल्या सात बैलांना जीवदान दिले. पोलिसांनी या कारवाईत ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रणजीत खेडकर, पो. कॉ. गजानन चालक इरफान हे गस्तीवर असताना भातकुलीकडून अकोल्याकडे एका मालवाहू वाहनात गोवंश कत्तलीकरिता विनापरवाना घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी मूर्तिजापूर- दर्यापूर मार्गावरील दुर्गवडा फाटा येथे सापळा रचला. पहाटे ४ च्या सुमारास दुर्गवाडा फाटा येथे भातकुलीकडून टाटा इंट्रा मालवाहू गाडी पोलिसांना येताना दिसली. वाहन चालकास थांबण्याचा इशारा केला असता त्याने गाडी न थांबवता भरधाव वेगात लाखपुरीच्या दिशेने वळवले असता ते अनियंत्रित झाले आणि रस्त्याच्या खाली उतरले. वाहनातील दोघे जण पोलिस वाहनापर्यंत पोहोचायचे आत अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहन क्रमांक एमएच ३० बी.डी. ४३३५ मध्ये ७ बैल दाटीवाटीने दोरखंडाने बांधलेले दिसून आले. पोलिसांनी जप्त करून गोवंश संत पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थान मूर्तिजापूर येथे दाखल केले. ही कारवाई ठाणेदार श्रीधर गुठ्ठे, उप निरीक्षक चंदन वानखडे, रणजीत खेडकर, पो. कॉ. गजानन सयाम, रितेश मददी, इरफान यांनी केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article