Published on
:
23 Sep 2024, 6:14 am
Updated on
:
23 Sep 2024, 6:14 am
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली.
बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. विशेषत: मुंबईतील काही मतदारसंघा संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी ३० मिनटं बैठक झाली. विधान सभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक पार पडली आहे.