कन्नड-सोयगाव विधानसभेची जागा मिळावी म्हणून देव पाण्यात:महायुतीच्या इच्छुक उमेदवारांची निवडणुकीसाठी तयारी

20 hours ago 1
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागुन दोन दिवस झाले तरी देखील महायुतीत राज्यातील २८८ जागा पैकी ९० जागेचा तिढा सुरुच आहे. या ९० जागेत कन्नडची जागा आहे. त्यामुळे कन्नड -सोयगाव विधानसभासभेची जागा आपल्याच पक्षाला सुटावी यासाठी कन्नडचे महायुतीच्या पक्षातील सर्वच इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहे. महाविकास आघाडीकडून कन्नड विधानसभा मतदारसंघ हा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आला आहे. जिल्ह्यातील कन्नड वगळता सर्व ठिकाणी महायुतीचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्यात एकतरी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटावी म्हणून माजी आमदार नितीन पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत अजित पवारांचे घड्याळ हातात बांधले. हे जरी खरे असले तरी मात्र माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या नुसत्या चर्चेने महायुतीच्या इच्छुकांच्या तोडंचे पाणी पळाले आहे. काही तर आचारसंहिता लागल्यापासून मुंबईत तळ ठोकून बसले आहे. तर काही जण १०० ते २०० गाड्याचा ताफा मुंबईत घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. अपक्ष उमेदवार मात्र निवडणुकीची रंगत संख्या जास्त असणार यावेळी अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या निच्छितच जास्त असणार आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे काही झाले तरी निवडणूक लढणार आहे हे त्रिवार सत्य आहे. उद्योजक मनोज पवार यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मुलाखत देऊन आले आहे. जर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर उद्योजक मनोज पवार यांची उमेदवारीसाठी वर्णी लागू शकते, अशी चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनात सहभाग नोंदवीणारे चापानेरचे डॉ.अशोक पवार यांचे देखील नाव मनोज जरांगे पाटलाच्या सर्वेमध्ये आघाडीवर असल्याचे बोलले जाते आहे. महापरिवर्तन आघाडीने जर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाच तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सदस्य तथा कृषीभूषण भाऊसाहेब थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. अपक्ष म्हणून प्रा.लखन चव्हाण देखील निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे. भाजपचे इच्छुक शांत आचारसंहिता लागण्याच्या अगोदर भाजपमधील डॉ. संजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, तालुका अध्यक्ष किशोर पवार या इच्छुकांनी कन्नड मतदान संघ भाजपला सोडवण्यासाठी अनेक वेळा पक्षश्रेष्ठींला विनंती केली, पत्रव्यवहार देखील केला. मात्र काहीही केल्याने महायुतीत कन्नड मतदारसंघ भाजपला सुटणाराच नसल्याचे जेव्हा भाजप मधील इच्छुकांच्या लक्षात येताच त्यांनी आपला बो-या बिस्तर बांधून ठेवत शांत बसणे पसंत केले. संजना जाधवाचा शिवसेनेत प्रवेश होणारच महाविकास आघाडीकडुन विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी जवळपास निच्छितच आहे. जरी काही पक्षातील कार्यकर्त्यांकडून सर्वे करण्याची मागणीनुसार सर्वे झाला आहे. सर्वे काही आला तरी देखील उध्दव ठाकरे हे उदयसिंग राजपूत यांची उमेदवारी कापणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभेसारखा प्रयोग कन्नड मतदारसंघात मराठा सक्षम उमेदवार देऊन पुन्हा करतील, अशी जोरदार चर्चा तालुक्यात आहे. सर्वेत देखील संजना जाधव यांचे नाव असल्याने आणि मराठा आणि नवीन सक्षम चेहरा असल्याने कोणाकडून कितीही प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न केला गेला तरी संजना जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश हा होणार असल्याचे बोलले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article