Published on
:
03 Feb 2025, 6:13 am
Updated on
:
03 Feb 2025, 6:13 am
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.
या बजेटमधील सर्वाधिक आकर्षक घोषणा म्हणजे रु. 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असेल. अर्थमंत्र्यांनी ही घोषणा करताच Nifty Consumption निर्देशांक सव्वा तीन टक्क्यांनी उसळला. कराचे वाचलेले पैसे लोक उपभोग्य वस्तूंच्या खरेदीवर खर्च करतात, हे ओघानेच आले. सोबतचे शेअर्स पाहा आणि त्यांच्यामध्ये बजेटच्या दिवशी झालेली वाढ पाहा. हेच शेअर्स पुढील वर्षभर पैसा मिळवून देण्याची शक्यता आहे.
निफ्टी 23500 च्या खाली गेल्यास तो 22500 पर्यंत घसरण्याची भीती बर्याच तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मागील सोमवार उजाडला तोच चीनच्या डीपसीक या Artificial Intelligence च्या Free Chatboot बातमी घेऊन. या मोफत चॅटबोटने अमेरिकेच्या टेक्नॉलॉजी शेअर्सची धूळधाण उडवली. Nvidia चा शेअर 20 टक्के कोसळला, भारतात निफ्टी 22786.90 पर्यंत घरंगळला; मात्र तिथून तो जो सावरला तो पुढील चार दिवस त्याने बजेटपूर्व रॅलीची झलक दाखवली. बजेटच्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याने 23631.40 चा High दाखवला.
deepseek चा प्रभाव भारतीय AI शेअर्सवर विशेष नाही
deepseek चा प्रभाव भारतीय AI शेअर्सवर विशेष पडला नाही. शुक्रवारी Economic Sarve संसदेत सादर केला गेला. भारताचे मुख्य वित्तीय सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी तो सादर केला. निर्गुंतवणुकीवर भर देताना त्यांनी 2025-26 मध्ये भारताचा विकास दर 6.3 ते 6.8 टक्के राहील, असे सांगितले Renevable Energy, Artificial Intelligence कडे वळणे हे फार गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई कमी झाली आहे. Consumption वाढत आहे आणि त्याला देशांतर्गत घटक हातभार लावत आहेत. या ठीकठाक सर्व्हेमुळे शुक्रवारी निफ्टी 1.11 टक्क्यांनी वाढून 23500 च्या वर बंद झाला.
मागील पूर्ण सप्ताह आणि बजेटच्याही दिवशी Realtiy शेअर्सनी मोठी तेजी दाखवली. अर्थमंत्र्यांनी केलेल्या दोन महत्त्वाच्या घोषणा याला कारणीभूत ठरल्या. पहिली म्हणजे ह्यापूर्वी घरभाड्यापासून मिळणार्या उत्पन्नावर 2 लाख 40000 पर्यंत करकपात होत नव्हती. ती मर्यादा वाढवून 6 लाख करण्यात आली आणि दुसरी म्हणजे टॅक्सपेअर्स आता आपल्या विवरणपत्रामध्ये दोन घरे दाखवू शकतात. यावर त्यांना कर भरावा लागणार नाही. या दोन घोषणांमुळे Phoenix, Prestige Estates, Lodha हे शेअर्स चांगलेच वधारले.
realty मधील शेअर्सनी मागील सप्ताहात दाखवलेली तेजी आणि बजेटमधील वर उल्लेखलेल्या दोन घोषणा पाहता हे शेअर्स वर्षभर चांगलीच तेजी दाखवतील असे वाटते. त्यानुसार खालील शेअर्सकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
Sobha Developers CMP Rs. 1375.90
Prestige Estates CMP Rs. 1431.70
Brigade CMP Rs. 1163.80
Lodha CMP Rs. 1280.15
Phoenix CMP Rs. 1764.40
रेल्वे कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवलेल्या गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सची अर्थमंत्र्यांनी अगदीच निराशा केली. मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात रेल्वे सेक्टरसाठी रु. 2.51 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये यावर्षी काहीही वाढ झाली नाही. त्यामुळे फ्युपिटर वॅगन्स, टिटागर रेल, आयआरएफसी, रेलटेल, आरव्हीएनएल, इरकॉन हे शेअर्स 6 टक्के ते 9.3 टक्के कोसळले.
जहाज बांधणी क्षेत्राच्या विकासासाठी maritime Development फंडाची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसेच मोठ्या जहांजांचा समावेश lnfrastructure List (HML) मध्ये करण्यात येईल, असेही घोषित केले. तसेच Ship Building Clusters निर्माण केले जातील आणि त्यांना अधिक पायाभूत सुविधा, कौशल्यपूर्ण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान पुरविले जाईल. या तरतुदींचा लाभ Mazagaon Dock, Shipping Corporation, Cochin Shipyard, Garden Reach Shipbuliders या कंपन्यांना होईल SCI चा शेअर 6 टक्के, तर GRSE चा शेअर शुक्रवारी 4.5 टक्के वाढला.
'हे' शेअर्स वाढण्याचे संकेत
विमा कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांवरून 100 टक्के करण्यात आली. 2047 पर्यंत शासनाचे Insu चे धोरण आहे. 100 टक्के परदेशी गुंतवणुकीला मुभा दिल्यामुळे या सेक्टरमध्ये स्पर्धात्मकता वाढून ग्राहकांना अधिक दर्जेदार सुविधा मिळतील. या धोरणाचा लाभ SBI Life Insurance HDFC Life Insurance, ICICI Lambard General Insurance या कंपन्यांना होईल. Blue Star Ltd hr Air Purifiers Air Cooters, Water Purifiers बनविणारी एक अत्यंत दर्जेदार कंपनी आहे. या कंपनीच्या Fundamentals चा वाचकांनी जरुर अभ्यास करावा. या कंपनीच्या शेअर्समध्ये FII आणि DII यांचे प्रमाण लक्षणीय आहे. शेअरचा शुक्रवारचा बंद भाव 2058 रुपये होता. डिसेंबरअखेरचे कंपनीचे आर्थिक निकाल उत्तम आहेत. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यामुळे Consumption Stocks मध्ये तेजी येईल. त्यामध्ये हा शेअरही वाढण्याचे संकेत आहेत.