दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.ANI X Account
Published on
:
03 Feb 2025, 8:13 am
Updated on
:
03 Feb 2025, 8:13 am
दिल्ली: ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराची राळ उठवली आहे. दिल्ली विधानसभा सत्ताधारी आपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेससाठीही महत्वाची आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.३) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आप (आम आदमी पक्ष) सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य कसे धोक्यात आणले जात आहे, यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी टीका केली.