BudgetSession2025 | "PM मोदींची कल्पना चांगली, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी"; राहुल गांधींच्या विधानावरून संसदेत गोंधळFile Photo
Published on
:
03 Feb 2025, 10:30 am
Updated on
:
03 Feb 2025, 10:30 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: BudgetSession2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (दि.३) दुसरा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर संसदेत चर्चा होत आहे. दरम्यान, महाकुंभाच्या मुद्द्यावर विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजप खासदारांच्या भाषणांनंतर संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी अर्थसंकल्पावरून सत्ताधारी सरकारला घेरले. यासोबतच राहुल यांनी चीन आणि मेक इन इंडियाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर हल्लाबोल केला.
'मेक इन इंडिया' चांगली कल्पना, पण...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणात काहीही नवीन नव्हते, असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधानांनी 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाचा प्रस्ताव मांडला, मला वाटते की तो एक चांगला विचार होता... त्याचा परिणाम तुमच्यासमोर आहे, उत्पादन २०१४ मध्ये जीडीपीच्या १५.३% वरून आज जीडीपीच्या १२.६% पर्यंत घसरले आहे, जे गेल्या ६० वर्षांतील उत्पादनाचा सर्वात कमी वाटा," असे राहुल गांधी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मी पंतप्रधानांना दोष देत नाहीये, त्यांनी प्रयत्न केले नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मी म्हणू शकतो की पंतप्रधानांनी प्रयत्न केले, पण ते अयशस्वी झाले.