महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतदेहांना नदीत टाकून दिल्याचा धक्कादायक आरोप समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महाकुंभ मेळाव्यात शनिवारी पहाटे चेंगराचेंगरी होऊन ३० जण ठार झाले आहेत. ही आकडेवारी अनेक तासांनंतर जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी या आकडेवारीच्या सत्यतेवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता खासदार जया बच्चन यांनी नदीत मृतदेहांना टाकून दिले तर पोस्टमार्टेमचा प्रश्न येतोच कुठे असा सवालही जया बच्चन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रेतं नदीतच टाकल्याने नदीचे पाणी खूपच प्रदुषित झाल्याचेही जया बच्चन यांनी म्हटले आहे.
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांच्याशी काही चॅनलचे प्रतिनिधी बोलले. त्यावेळी जया बच्चन म्हणाल्या की आता सर्वात दूषित पाणी कुठे आहे. कुंभ मध्ये तेथे चेंगराचेंगरी झाली तेव्हा ज्या लोकांचे मृत्यू झाले त्यांचे मृतदेह नदीत फेकले गेले. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. या मुद्दयांवर कोणी बोलत नाही असेही त्या म्हणाल्या. समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी कुंभ मेळाव्यात आलेल्या लोकांच्या संख्येवरुन देखील सवाल केले आहेत. कुंभ मेळाव्याला आलेल्या श्रद्धाळूंना कोणतीही सुविधा दिली जात नाही.त्याच्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था नाही.तेथे कोट्यवधी लोकांनी भेट दिली असे खोटे सांगितले जात आहे. एवढी मोठी संख्या असलेले लोक एका जागी कसे एकत्र येऊ शकतात ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
मृत्यू झालेल्यांचे खरे आकडे द्यावेत
जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर भाजपाचे नेते, धार्मिक संघटना आणि सोशल मीडिवर जया बच्चन यांच्याविरोधात टीका केली जात आहे. भाजपाने या हिंदू आस्था आणि कुंभ मेळ्याच्या अपमान म्हटले आहे. धार्मिक संघटनांनी आणि नेत्यांनी जया बच्चन यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. जया बच्चन यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आणि असंवेदनशील आहे असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.या आधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबदद्ल अनेक प्रश्न केले आहेत. सरकारने कुंभमधील चेंगराचेंगरीतील मृत्यू झालेल्यांचे खरे आकडे द्यावेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका करताना अखिलेश यादव यांनी जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची सर्व व्यवस्थापन लष्कराच्या हाती सोपवावी अशीही मागणी केली आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने हे सर्व दावे फेटाळत कुंभमध्ये स्वच्छता आणि सुरक्षा यांचा योग्य मेळ आहे.नदीत कोणतेही शव सापडलेले नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे.