वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाच्या गोचराचा संबंध हा थेट बारा राशींवर होत असतो. गोचराचा अर्थ एखाद्या ग्रहाच्या रशी परिवर्तनाशी असतो. जेव्हा एखादा ग्रह आपल्या पूर्वीच्या राशीमधून नव्या राशीमध्ये किंवा नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर असं म्हटलं जातं. गोचराचा परिणाम हा बाराही राशींवर होत असतो. यातील काही राशींवर शुभ परिणाम होतो तर काही राशींना गोचराचा फटका बसतो. गुरु चार फेब्रुवारीला दुपारी आपली चाल बदणार आहेत, गुरु वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. सुख, समृद्धी, सौभाग्य आणि वैभव यांचं प्रतिक म्हणून गुरु ग्रहाकडे पाहिलं जातं. गुरुच्या गोचरामुळे चार राशींच्या लोकांची लॉटरी लागणार असून, नशीब जोरावर राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये यशच यश मिळण्याचे संकेत दिसत आहेत. जाणून घेऊयात या भाग्यशाली राशींबद्दल
वृषभ रास – गुरुच्या सरळ चालीचा वृषभ राशीवर अत्यंत शुभ परिणाम होणार आहे. घरामध्ये एखादं धार्मिक कार्य होऊ शकतं, नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. तुम्ही जर एखाद्या परदेशवारीचा प्लॅन बनवत असाल तर या काळात तुम्ही परदेशवारी देखील करू शकता. ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे, अशा लोकांची या काळात लग्न देखील होऊ शकतात. या काळात आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे.
कन्या रास – कन्या राशीवर देखील गुरु गोचराचा मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. कन्या राशींच्या लोकांची जी काही कामं अ़डलेली आहेत, उद्यापासून त्यातील अडथळे दूर होऊन सर्व कामे पूर्ण होणार आहेत. विवाहामध्ये अडचणी येत असतील तर त्या देखील दूर होऊन, विवाहाचा योग बनत आहे. आर्थिक उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील, आर्थिक स्थिती चांगली राहणार असून, नोकरीमध्ये प्रमोशनचा योग आहे. अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं मोठं काम या काळात होण्याची शक्यता आहे.
मकर रास – मकर राशींच्या लोकांचं नशीब देखील चमकणार आहे. या काळात मकर राशींच्या लोकांना संतती सुख मिळू शकतं. जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. घरात एखादं धार्मिक कार्य होऊ शकतं.
वृश्चिक रास – गुरु उद्या म्हणजेच चार फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता वृषभ राशीमध्ये गोचर करणार आहे. याचा शुभ प्रभाव हा वृश्चिक राशीवर पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं काम पूर्ण होऊ शकतं. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत या काळात निर्माण होऊ शकतात. नोकरीमध्ये प्रमोशनचा योग आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)