मोठी बातमी समोर येत आहे, धाराशिवमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, भाजप आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे, प्रकार समोर येताच पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांकडून चोप देण्यात आला आहे. आशिष विसाळ असं या पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.
जनआक्रोश मोर्चाच्या नावानं तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करायची आहे, असं सांगून हा व्यक्ती अधिकाऱ्यांकडे पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने आपण सुरेश धस यांचा पीए असल्याचं देखील भासवलं, दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर मराठा आंदोलकांनी विसाळ याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
आशिष विसाळ हा आमदार सुरेश धस यांच्या नावावर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांनी या व्यक्तीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. विशेष म्हणजे या व्यक्तीनं माजी जिल्हाधिकारी प्रवीण गोडाम यांचं नाव आणि फोटो डीपीला ठेवला होता. आपण गोडाम यांचे खास मित्र असल्याचा दावा करत या व्यक्तीने अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याचं समोर आलं आहे.
नाशिकचे आयुक्त आणि धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवून पैसे गोळा करत असल्याचा आरोप आशिष विशाळ या व्यक्तीवर करण्यात आला आहे . दरम्यान आता या सर्व प्रकरणावर गोडाम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझे कार्यक्षेत्र हे नाशिक आहे, मराठवाड्यामध्ये माझे नाव सांगून जर कोणी पैसे घेत असेल तर ते पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन नाशिकचे आयुक्त आणि धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केले आहे. या व्यक्तीला मराठा आंदोलकांनी चांगलाच चोप दिला आहे, त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंआहे, घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.