Published on
:
03 Feb 2025, 5:37 pm
Updated on
:
03 Feb 2025, 5:37 pm
चंद्रपूर : चंद्रपूरसह राज्यात जिहाद सुरू आहे. त्या सगळ्यांना कळले पाहिजे, कि महाराष्ट्रामध्ये हिंदूत्ववादी विचारांचे सरकार सत्तेमध्ये आहे. लव जिहाद, लँड जिहाद तसेच गौमातेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची तुमची वळवळ वेळेत थांबली नाही तर तुम्हाला शोधून शोधून तुरूंगात टाकु असा इशारा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला. काल रविवारी रात्री चंद्रपूरात हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते.
चंद्रपूरात आयोजित करण्यात आलेल्या हिंदू धर्मसभेला मुरर्लीधर महाराज यांच्यासह हिंदू सहकाऱ्यांची उपस्थिती होती. हिंदू धर्मसभेला संबोधीत करताना नितेश राणे म्हणाले, हि मोर्चा काढण्याची वेळ नाही, प्रशासनाला इशारा देण्याची गरज नाही, पोलिसांकडून मागणी करण्याचीपण गरज नाही. कारण आम्ही सगळेच्या सगळे हिंदूत्ववादी विचाराचे लोक आहोत ते सर्व सत्तेत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणसवी हे कडवड हिंदूत्वादी म्हणून राज्याचे नेतृत्व करताहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे कडवट सैनिक म्हणून नेतृत्व करीत आहेत. असंख्य हिंदूत्ववाद्याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत, त्यामुळे हिंदू समाजाची अपेक्षा वाढली आहे.
तुम्ही लव जिहाद व लँड जिहादच्या नावाने आमच्या हिंदूसमाजाच्या विरोधात भूमिका आणि नाटकं सुरू केली आहे, ती तुम्ही वेळेत बंद केली नाही तर तुमचा पाकिस्तान मध्ये बसणारा तुम्हाला आपोआपच ओळखणार नाही अशी अवस्था करून टाकू, असा कणखर इशारा या प्रसंगी दिला. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणारे जे जिहादी मानसिकतेचे कारटे आहेत. त्यांना आमच्या राज्यामध्ये स्थान नाही. आमच्या हिंदू बहिणींकडे वाकड्यानजरेने तुम्ही पाहिले तर आमचे पोलिस करतील ते करतील पण चुकून तुम्हाला बेल मिळाली तर मी दरवाज्यावर उभा राहून तुमचा कार्यक्रम करीन असा थेट इशाराच दिला.
हिंदू बहिणींना सुरक्षित करण्यासाठी देशात सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा राज्यात आणून दाखविण्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या काळात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावत होते परंतु आता तुम्ही ते करू शकत नाही. चंद्रपूरात 22 लँड जिहादची प्रकरण घडली आहेत. आमच्या हिंदू राष्ट्रात पहिले हिंदूचे हित बघितले जाणार त्यानंतर इतरांना मोजले जाणार असा आमचा नियम असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. महाराष्ट्रात गौहत्या प्रतिबंध कायदा अस्तित्वात असणा-या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे. राज्यात शंभर टक्के अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागेल,कारण आमच्या सरकारचे तसेच निर्देश असल्याचे त्यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून सांगितले. आता हिंदू धर्म सभेप्रसंगी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.