बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी (16 जानेवारी) प्राणघातक हल्ला झाला. सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर सैफ अली खानला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. या हल्ल्यानंतर आता पहिल्यांदाचा सैफ अली खान एका कार्यक्रमात सहभागी झाला. यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.
सैफ अली खानचा आगामी चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. ‘ज्वेल थीफ’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा नुकताच पार पडला. नेटफ्लिक्सने आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी मुख्य अभिनेता असलेला सैफ अली खानही उपस्थित होता. त्याच्यासह चित्रपटातील इतर व्यक्तीही यावेळी हजर होते. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सैफ अली खानची प्रतिक्रिया
यावेळी सैफ अली खानला तुला इथे आता उभं राहून कसं वाटतंय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिले. “मला इथे उभं राहून खरंच खूप चांगलं वाटत आहे. मला इथे येऊन खरंच खूप मस्त वाटत आहे. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. सिद्धार्थ आणि मी या चित्रपटावर खूप दिवसांपासून चर्चा करत आहे. हा चित्रपट एक खूपच सुंदर चित्रपट आहे आणि मी यासाठी प्रचंड उत्सुक आहे”, असे सैफ अली खान म्हणाला.
सैफ अली खान बोलतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओत सैफ अली खानच्या मानेच्या उजव्या बाजूला हल्ल्याच्या जखमा पाहायला मिळाल्या. तसेच त्याच्या हातालाही बँडेड लावण्यात आली होती.
‘ज्वेल थीफ’ चित्रपटाबद्दल…
दरम्यान ‘ज्वेल थीफ’मध्ये सैफ एका चोराच्या भूमिकेत झळकणार आहे. सैफ अली खानवर रेड सन नावाचा ५०० कोटींचा हिरा चोरी करण्याची जबाबदारी सोपण्यात येते. हा चोरीचा खेळ पुढे आणखी भयंकर होतो. या चोरीच्या कथानकादरम्यान पुढे काय काय घडते त्याचा प्रवास ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटात पाहायाल मिळणार आहे. या चित्रपटात ड्रामा, सस्पेन्स, मारामारी, डान्स या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत.