दूधात मखाने मिसळून खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला खूप मोठा फायदा होता. मखाने खाल्ल्याने अनेक शारीरिक आजार दूर होतात. ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांच्यासाठी तर मखाने वरदान आहेत. मखाना आणि दूध याचे एकत्र अन्न खाल्ल्याचे आणखीन देखील बरेच फायदे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थ संकल्पात मखाने निर्मितीसाठी बिहार राज्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
दूध आणि मखाना शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक जण वजन कमी करण्यासाठी केवल मखाने खातात. परंतू दूधासोबत जर मखाने खाल्ले तर आरोग्यासाठी मोठा लाभ होतो. मखाने आणि दूध एकत्र खाल्ल्याने अनेक व्याधी दूर होतात. मखाने पोषक म्हणून ओळखले जातात. यांना सुपर फूड मानले जाते. तर दूधाला तर पूर्ण अन्न म्हटले जाते. त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याचा खूपच लाभ होत असतो.
दूधात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. जेव्हा तुम्ही मखान्यांना दूधात मिक्स करुन खाता तेव्हा याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. अनेक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतात. आयुर्वेदिक एक्सपोर्ट डॉ. किरण गुप्ता यांच्यामते मखाने दूधात सोबत खाल्ल्याने शरीरास आवश्यक पोषणमूल्ये मिळतात.
हे सुद्धा वाचा
बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घेतला आहे. त्यामुळे या उद्योगात गुंतलेल्या बिहारमधील मिथिलांचल प्रदेशातील, विशेषत: दरभंगा, मधुबनी, सीतामढी, सहरसा, कटिहार, पूर्णिया, किशनगंज, अररिया, सुपौल आणि मधेपुरा जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मखाने हे कमळाच्या बियांपासून तयार केले जातात. मखान्याला इंग्रजीत फॉक्स नट्स म्हणतात. मखाना हा एक वनस्पतीद्वारे तयार केला जणारा अन्न पदार्थ आहे. मखान्याचे उत्पादन भारतात, कोरिया, जपान, रशियामध्ये केले जाते.
हाडांना मजबूत करते
मखाने आणि दूध एकत्र घेतल्याने शरीराला फायदा होतो. कारण दूध आणि मखाने दोन्हीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठे असते. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम, लोह आणि जस्त यांचेही मखान्यात मोठे प्रमाण असते. आर्थराईटिस आणि ऑस्टीयोपोरोसिस सारख्या हाडांच्या संबंधित आजारांना बरे करण्यासाठी महत्वाचे ठरते. याचा नियमित आहारात वापर केल्याने हाडे आणि दांत दोन्ही अगदी मजबूत आणि आरोग्यदायी होतात. म्हणून मखाने खूप फायदेशीर असतात.