परभणीतील जिंतूर तालुक्यातील
भिलज येथील घटना
१ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल लंपास
परभणी (Jintur Crime) : जिंतूर तालुक्यातील भिलज येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरे फोडली. सोन्याची दागिने आणि रोख रक्कम मिळून १ लाख ७८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या (Jintur Crime) प्रकरणी अनोळखी चोरट्यांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप उबाळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे घरामध्ये झोपलेले होते. त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास जाग आली असता घराच्या बाजुच्या खोलीत खडखडचा आवाज आला. त्यांनी खिडकी उघडून पाहिल्यावर त्यांना कपाटाचे दार उघडे दिसले. तसेच सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. फिर्यादीच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावलेला होता. त्यांनी शेजारी असलेल्या मेव्हण्याला फोन करून बोलावून घेतले. (Jintur Crime) खोलीचे दार उघडल्यानंतर पाहणी केल्यावर त्यांना सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून ६८ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले.
याच दरम्यान गावातील नवनाथ उध्दव शेळके यांच्या घरातून रोख ८० हजार, पंडितराव गंगाराम गायकवाड यांच्या घरातून रोख ३० हजार रुपये चोरीला गेल्याचे समजले. चोरट्यांनी तिन्ही घरातून १ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. जिंतूर पोलीसात (Jintur Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. जाधव करत आहेत.