परभणी (Parbhani) :- बँकेचे कर्ज(Bank Loan)आणि मराठा आरक्षण कधी मिळेल, या विवंचनेत ४२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Agricultural University) परिसरातील नवीन विज्ञान भवन इमारत जवळ असलेल्या नाला परिसरात २ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
परभणी शहरातील कृषी विद्यापीठ परिसरातील घटना
सुरेश रामचंद्र चोपडे यांनी खबर दिली आहे. पांडुरंग रामचंद्र चोपडे वय ४२ वर्ष, असे मयताचे नाव आहे. पांडुरंग चोपडे हे बँकेचे कर्ज कसे फेडावे, मराठा आरक्षण मिळत नाही, मुलीच्या शिक्षणाचा व लग्नाचा खर्च कसा करायचा या विवंचनेत होते. यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केली. नवा मोंढा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोह. मुंढे करत आहेत.