आखाडा बाळापूर पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील सुकळी विर येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवित उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे निवेदन देण्यात आले शक्तिपीठ महामार्गाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विरोध होत असतानाच कळमनुरी तालुक्यातील सुकळी येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना (दिनांक ३ फेब्रुवारी) रोजी निवेदन देत विरोध केला आहे.
या निवेदनात शेतकऱ्यांनी महामार्गात जाणाऱ्या जमीन ही सुपीक असून यामध्ये अल्पभूधारक शेतकरी आहोत आमची शेती आमच्या उपजीवीकेचे एकमेव साधन असल्यामुळे सदरील जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग करण्यात येऊ नये असे निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर ३२ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
त्यात चंद्रकांत सारंगे, मथुराबाई खरोडे, नरहरी गुंजकर, सखाराम सूर्यवंशी, पांडुरंग पवार, शंकर वीर, हरिभाऊ क्षिरसागर, ज्ञानेश्वर वीर, सीताबाई मात्रे सह ३२ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.